Sunday, March 7, 2010

Thursday, February 18, 2010


उद्या शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी तसा शासकियचम्हणावा लागेल कारण खरे पाहता महाराष्ट्रमधे शिवजयंती तिथि प्रमाणे साजरी करण्याची परंपरा आहे। या तेजस्वी महापुरुषाच्या जन्म दिवसाबद्दल असा घोळ असावा हे दुर्दैव च म्हणावे लागेल। इतिहास संशोधकानी खरे तर गंभीर विचार करने गरजेचे आहे। पण काही इतिहास संशोधक जे कोंग्रेजी विचरने प्रेरित आहेत ते शिवाजी महाराजांची कोंग्रेजी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत नव्हे करता आहेत। आपल्या देशात तिथि प्रमाणे उत्सव साजरे करण्याची प्रथा फार प्राचीन कालपासून आहे त्यामुळे जनमानसात सुद्धा शिवजयंती तिथि प्रमाणेच साजरी होते। या जन भावनेचा सर्वांनीच आदर केला पाहिजे। परन्तु कोंग्रेजी इतिहास विचारवंत हे मान्य करायला तयार नाहीत कारण त्याना नेहमीच शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल संभ्रम निर्माण करावयाचा आहे ज्यामुले येणारया नविन पिढीला महाभारत, रामायणाप्रमानेच काही वर्षांनंतर शिवाजी राजांचा इतिहास सुद्धा दंतकथा वाटावी आपल्या गौरवशाली इतिहासाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचे काम हे कोंग्रेजी विचारवंत व इतिहास तज्ञ करतात याला त्यांची मेकैलो च्या शिक्षण पद्धतीची मानसिकता कारणीभूत असावी। कारण असे नसते तर जन भावनेचा आदर करून ते तिथि प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यास तयार झाले असते। जर त्याना राजान्बद्दल प्रेम असते तर त्यानी हे पाऊल उचलले असते किंवा त्याना शिवाजी राजाना खरोखरच शासन दरबारी ठेवायचे आहे का आणि हाच उद्देश असेल तर त्यानी १९ फेब्रुवारी ला खरोखरच शिवजयंती चालू ठेवावी म्हणजे ५० वर्षांनंतर या महाराष्ट्रात १९ फेब्रुवारीच काय कधीच खरोखर जनतेची शिवजयंती साजरी होताना दिसणार नाही। मला जे सुचले ते में लिहिले शिवजयंती ही सार्वजनिक स्वरूपात व संपूर्ण देशात सामाजिक भावनेने साजरी व्हावी त्यात कोणताही वाद नसावा असेच प्रतेक शिवाप्रेमीला वाटते एवढेच.